Chaderi News : अभिनेत्री गहनाचा शर्लिन चोप्रावर गंभीर आरोप; म्‍हणे, शर्लिनला कपडे कसे काढायचे एवढेच माहीत!

मुंबई ः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे. या प्रकरणात अनेक अभिनेत्री आणि मॉडेलची नावेसुद्धा समोर येत आहेत. गंदी बात या वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या गहना वशिष्ठने राज कुंद्राची बाजू घेतली आहे तर मॉडेल शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक …
 

मुंबई ः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे. या प्रकरणात अनेक अभिनेत्री आणि मॉडेलची नावेसुद्धा समोर येत आहेत. गंदी बात या वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या गहना वशिष्ठने राज कुंद्राची बाजू घेतली आहे तर मॉडेल शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीत येण्यासाठी राजने भाग पाडल्याचा आरोप केला होता. त्यावर गहनाने शर्लिनवर टीकेची झोड उठवली आहे. एका मुलाखतीत गहना म्हणाली, की शर्लिननेच राज कुंद्राला पॉर्न इंडस्ट्रीत ओढले आहे. २०१२ पासून शर्लिन अश्लील चित्रफिती बनवते. मात्र राज तिला अडीच वर्षांपूर्वी भेटला आहे. शर्लिनला फक्त कपडे कसे काढायचे एवढेच माहीत असल्याने ती इतरांवर चिखल उडवते, असे गहना म्हणाली. राज कुंद्रा विरोधात बोलले तर सर्व जण आपल्याकडे लक्ष वेधतील असे शर्लिन ला वाटते. मात्र शर्लिन आज जे काही आहे ती केवळ आणि केवळ राज कुंद्रामुळेच आहे. त्यामुळे शर्लिनने राजचे केवळ आभार नाही तर पूजा केली पाहिजे, असा टोला गहनाने लगावला आहे.