तुम्‍हाला कायम उत्‍सुकता असते ना की श्वेता तिवारीच्या सुंदरतेचे रहस्य काय? मग आता वाचा...

 
अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही सिरियलची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फिटनेस आणि सौंदर्यामुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. तिच्या दुसऱ्या प्रेग्नसीमध्ये तिचे वजन ७० किलोपर्यंत वाढले होते. मात्र त्यानंतर तिने वजन नियंत्रित केले. आता श्वेता तर दिवसेंदिवस अधिक तरुण होत असल्याचा कंमेंट्स अनेक जण करत आहेत. विशेष म्हणजे तिच्या मुलायम त्वचेमुळे तिच्या वयाचा अंदाज घेणेही कठीणच जाते. टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवताना श्वेता जशी दिसायची तशीच आजही दिसते.

फिटनेससाठी श्वेता तिवारी प्रचंड मेहनत घेते. वर्कआऊट आणि आरोग्यदायी आहार ती घेते. स्किन ग्लो ठेवण्यासाठी सौंदर्य प्रसाधने यासोबतच घरगुती उपायही ती करते. स्किन ग्लो ठेवण्यासाठी श्वेता नॅचरल प्रोडक्टचा वापर करते. हळदीपासून बनवलेले एक रेडिमेट उटणे श्वेता दुधात मिसळून लावते.

आधी उटणे लावून हलक्या हाताने मसाज आणि नंतर थोडावेळ सुखायला ठेवते. या उटण्यात संत्र्यांची साल, गुलाबाच्या पाकळ्या, हळद, निंबू, मेथी, सोप, केसर, निंबाची साल, नारळ, पिस्ता, बदाम तेलाचा समावेश असतो. किराणा दुकानात व बाजारात या वस्तू सहज उपलब्ध होतात.

या वस्तूपासून बनलेले उटणे दुधात मिसळून लावल्याने त्वचा नितळ होते. यासोबत वय कमी दिसण्यासाठी श्वेता कुमकुमादी तेलाचा वापर करते. भारतात अनेक वर्षांपासून या तेलाचा वापर केला जातो. या तेलाने त्वचेचा पोत सुधारतो. ब्राईटनेस वाढतो. त्यामुळे वय सुद्धा कमी दिसते. रोज रात्री श्वेता हे तेल लावते. त्यामुळेच ती एवढी सुंदर आणि तरुण दिसते.