अभिनेत्री करिश्मा तन्‍नाचं ठरलं बरं..!
 

 

मुंबई (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्‍ना काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब आहे. मात्र तरीही सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. काही दिवसांपूर्वी करिश्माने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू झाली. बॉयफ्रेंड वरुण बंगेरा यांच्‍याशी ती लवकरच लग्न करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, साखरपुड्याला काही कुटुंबियांना आणि मोजक्या मित्रपरिवाराला बोलावण्यात आले होते. वरुण रिअल इस्टेट बिजनेसमॅन आहे. करिष्मा आणि वरूणची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांचे बाहेर फिरतानाचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर करिष्मा उपेन पटेलला सुद्धा डेट करत होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने लव स्कूल नावाचा एक रिॲलिटी शोदेखील सुरू केला होता. पण काही कारणांमुळे करिश्मा आणि उपेनचा ब्रेकअप झाला होता. आता करिश्माचा वरुणशी साखरपुडा झाला असून, लवकरच दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तारिख अद्याप निश्चित नाही.