प्रियामणीचे विधान... म्हणाली, बॉलिवूडमध्ये साऊथच्या कलाकारांना चुकीचे पद्धतीने दाखवतात!
Updated: Feb 1, 2022, 15:45 IST
द फॅमिली मॅन या वेबसिरीजमुळे अभिनेत्री प्रियामणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या वेबसिरीजमुळे तिला लोकप्रियता मिळत आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये साऊथच्या कलाकारांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जात असल्याची टीका केली.
श्रीदेवी, हेमा मालिनी, रेखा यांसारख्या दाक्षिणात्य अभिनेत्रींनंतर बॉलिवूडमध्ये फारसं कोणी गाजलं नाही. दाक्षिणात्य कलाकारांचे अभिनय कौशल्य लोकांना आवडतंय. मात्र बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांची अशी प्रतिमा दाखवतात की या लोकांना हिंदी बोलता येत नाही. आमच्या भाषेची खिल्ली उडवली जाते, असे प्रियमणी म्हणाली. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. आता दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करत आहेत आणि यशस्वी देखील होत आहेत, असे प्रियामणी म्हणाली.