काजोलची बहीण तनीषा ४४ वर्षांची झाली पण अजूनही सिंगल!; हव्या त्या वयात आई बनण्यासाठी वाचा काय केले...
४४ वर्षांची झाली असली तरी तिने अजूनही लग्न केलेले नाही. लग्नासाठी परिवाराकडून कोणताही दबाव नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. तिने लग्न केलेले नसले तरी वयाच्या ३९ व्या वर्षी तिच्या अंडाशयातील अंडी काढून ते प्रयोगशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रक्रियेला एग्ज फ्रजिंग असे म्हणतात. यामुळे तनीषा तिला वाटेल त्या वयात आई बनू शकते.
एका मुलाखतीत ती म्हटली होती की, मला बाळ नाही यावर मी विचार करत होते. त्यावेळी एग्ज फ्रजिंगबद्दल माहिती मिळाली. या प्रक्रियेवेळी वजन खूप वाढल्याचे तिने सांगितले. मात्र त्यानंतर नियमित व्यायाम करून शरीर पुन्हा जैसे थे बनविल्याचे तिने सांगितले. प्रत्येक महिलेला मूल असेलच पाहिजे असे आवश्यक नाही. तुम्ही बाळाला दत्तक घेऊ शकता. जगात अनेक अनाथ मुले आहेत, असे ती म्हणाली. या विषयावर मोकळेपणाने चर्चा होण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला परिपूर्ण होण्यासाठी लग्न करण्याची आवश्यकताच आहे हा समज चुकीचा असल्याचेही ती म्हणाली.