बॉडी शेमिंगच्या टीकेला काजलचे प्रत्युत्तर!; म्हणाली, जगा अन् जगू द्या!!
Feb 13, 2022, 12:40 IST
अभिनेत्री काजल अग्रवालला आजही सिंघम गर्ल म्हणून ओळखले जाते. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख तिने निर्माण केली आहे. २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी तिने लग्न केले होते. त्यानंतर आता २०२२ च्या सुरुवातीलाच काजल आणि गौतम यांनी गूड न्यूज दिली आहे.
अनेक दिवसांपासून काजलच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू होती. त्यावर शिक्कामोर्तब करून आई - बाबा होणार असल्याचे दोघांनी जाहीर केले आहे. मात्र यावेळी काहींनी काजलच्या फोटोंवर घाणेरड्या कमेंट केल्या आहेत. काजलने इन्स्टाग्राम खात्यावर तिच्या दुबई ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून बॉडी शेमिंग करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे. मी माझ्या आयुष्यातील एकदम नव्या आणि आश्चर्यकारक टप्प्यातून जात आहे. आपण जरा दयाळूपणे वागायला शिकू. जगा आणि जगू द्या, असे तिने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. काजलची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे. काजल आणि गौतम ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत लग्न केले होते.