Chanderi news काश्मिर फाईल्स नंतर विवेक अग्निहोत्रींचा दिल्ली फाईल्स; "या" विषयाला आणणार प्रेक्षकांसमोर!

 
 मुंबई :  काश्मिरी पंडितांच्या वाट्याला आलेल्या दुःखांना जगासमोर आणल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी आता त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. काश्मिर फाईल्स नंतर विवेक अग्निहोत्री आता कोणता नवीन विषय घेऊन येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. दरम्यान स्वतः अग्निहोत्री यांनी  ट्विट करून नव्या चित्रपटाची घोषणा केली. दिल्ली फाईल्स अस या नव्या चित्रपटाचं नाव राहणार आहे.

काश्मिर फाईल्स या चित्रपटाला  भरभरून प्रेम दिल्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. गेल्या ४ वर्षात काश्मीर फाईल्स साठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले. काश्मिरी पंडितांच्या वाट्याला आलेला नरसंहार जगासमोर येणे गरजेचे होते. आता नव्या चित्रपटाची तयारी करीत असल्याचे विवेक अग्निहोत्री म्हणाले.

 विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निहोत्री यांचा आगामी काश्मीर फाईल्स हा चित्रपट दिल्लीत घडलेल्या गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारीत असणार आहे. अग्निहोत्री यांनी काही दिवसांआधी ट्विट करून चित्रपटाची माहिती दिली होती. सत्य लपवणे, न्याय नाकारणे आणि मानवी जीवनाला महत्व न देणे म्हणजे आपल्या लोकशाहीला कलंक आहे. द दिल्ली फाईल्स या चित्रपटातून सर्वाधिक बोल्ड आणि आपल्या काळातील हृदय पिळवटून कथा प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे विवेक अग्निहोत्रींनी   ट्विट मध्ये म्हटले आहे. चित्रपटाची शूटिंग लवकर सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.