Chanderi News : रश्मिका मंदानासोबत लग्न ठरल्याच्या बातम्या चुकीच्या!; विजय देवरकोंडाचा खुलासा
लग्नाबद्दलच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे देवरकोंडाने म्हटले आहे. असे असले तरी आतापर्यंत दोघांनी त्यांचे नाते नाकारल्याचे दिसत नाही. उघडपणे अजून स्वीकारलेही नाही. गेल्या काही दिवसांआधी २५ वर्षीय रश्मिकाने एका मुलाखतीत तिचे लग्नाबद्दलचे विचार स्पष्ट केले होते. मी आतापर्यंत लग्नाचा विचार केलेला नाही. मात्र असा पार्टनर हवा ज्याच्यासोबत कम्फर्टेबल वाटेल, असे ती म्हणाली होती.
विजय देवरकोंडा माझा चांगला मित्र आहे. त्याला समजून घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत, असेही ती म्हणाली होती. रश्मिका आणि विजयने दोन चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. रश्मिका सध्या तिच्या बॉलिवूडच्या पहिल्या मिशन मजनू चित्रपटाची शूटिंग करीत आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.