Chanderi News काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!

 
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आणि  तिचा पती गौतम किचलू यांच्या घरात बाळाचे आगमन झाले आहे. काजल आणि गौतमने मुलाला जन्म दिला आहे. मात्र दोघांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका वृत्तानुसार या जोडप्याने काल, १९ एप्रिल रोजी पहिल्या मुलाचे स्वागत केले.
 काजल गरोदर असल्याची बातमी तिचा पती गौतमने जानेवारीत जाहीर केली होती. त्याने काजलचे गरोदपणातील काही फोटो देखील पोस्ट केले होते. त्यानंतर काजलने स्वतः देखील इंस्टाग्राम खात्यावर तिचे फोटो शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी तिने पती गौतमबद्दल सुद्धा एक भावनिक पत्र लिहिले होते.  गेल्या ८ महिन्यांत तुला प्रेमळ बाबा बनतांना पाहिल्याचे काजलने लिहिले होते. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या बाळाला तुझ्यासारखा बाबा मिळाले असे तिने पतीचे कौतुक करतांना लिहिले होते.