CHANDERI NEWS लाखो तरुणांची क्रश असलेल्या हृता दुर्गुळेच शिक्षण माहीत आहे का? अभिनय क्षेत्रात आली नसती तर हृता होणार होती...! जाणून घ्या तिच्या करिअरबद्दल!
मुंबईच्या दादर भागातील एका सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. तिच्या आईवडिलांनी तिला इंग्रजी शाळेत शिकवलं. दादरच्या आयईएस व्ही एन सुळे गुरुजी विद्यालयातून ती शिकली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण तीन रुईया महाविद्यालयातून पूर्ण केलं. विशेष म्हणजे इथे तिने पत्रकारितेची पदवी घेतली.त्यानंतर तिने जाहिरात क्षेत्राचा अभ्यास केला. ती जर अभिनय क्षेत्रात आली नसती तर एकतर एखाद्या न्युज चॅनलमध्ये किंवा एखाद्या वर्तमानपत्रात तिने जाहिरात विभागात तिने नोकरी केली असती.
विशेष म्हणजे हृताला फारशी काही अभिनयाची आवड नव्हती. मात्र २०१३ मध्ये सहज गंमत म्हणून तिने दुर्वा मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि अनेक मुलींमधून तिची निवड करण्यात आली. आणि गंमत म्हणून दिलेली ऑडिशन तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर आपल्या सौंदर्याने, निरागस हास्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. २०१७ मध्ये आलेल्या फुलपाखरू या मालिकेने तीच आयुष्य बदलून गेलं. तरुणांना ती त्यांची क्रश वाटू लागली. अनेकांच्या मोबाईलची आणि हृदयाची जागा आता तिने घेतलीय.