CHANDERI NEWS आमिर खानची मुलगी आयरा डिप्रेशनमध्ये; म्हणाली, खूप रडावे वाटतेय, झोपही येत नाही

 
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या डिप्रेशनमध्ये आहे. तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती स्वतः सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबद्दल पोस्ट करून लोकांना जागरूक करीत असते मात्र आता इतरांना जागरूक करणारी आयरा स्वतः निराशेच्या गर्तेत सापडली आहे.

आयरा खानने इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली आहे. यात तिने मानसीकतेबरोबर तिला शारीरिक त्रास होत असल्याचेही म्हटले आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिला चंतेचे झटके येत आहेत. कधी ती आनंदात तर कधी अचानक नर्व्हस होते. कधी कधी तिला खूप रडावे वाटते असेही तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ती डिप्रेशनमध्ये असतांना हृदयाची धडधड वाढते.

श्र्वासाची गती वाढते ,रडू येते असे लक्षणे दिसत असल्याचे आयराने म्हटले आहे. असा त्रास तिला नियमित झाल्यास डॉक्टरांचा व मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल असेही ती म्हणते. मला खूप असहाय्य वाटत आहे..मला झोपायचे असते पण झोपच येत नाही असेही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.