ब्रेकअपवर श्रद्धा कपूर म्हणाली, 'अजून सांगा!'
 

 
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत झालेल्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या ४ वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि ४ वर्षांच्या नात्याला तडा गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट करून ब्रेकअपवर स्पष्टीकरण दिले आहे.
श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर नुकताच तिचा एक सुंदर फोटो अपलोड केला आहे. तिने या फोटोला दिलेले कॅप्शन चर्चेचा विषय ठरले आहे. अजून सांगा... असे दोनच शब्दांचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या बातम्या या अफवा आहेत, असे तर तिला सुचवायचे नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.  त्यामुळे दोघांमध्ये नेमके चालले तरी काय हे कळायला अजून तरी मार्ग नाही.