“शिवकृपा’च्या नितीन सोनटक्केंनी बुलडाणेकरांना दिलाय अपघात टाळण्याचा “मंत्र’; विशेष मुलाखतीत सांगितले ट्रिपल “ओ’चे गौडबंगाल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना घडतात. त्यात अनेकांचा जीव जातो. जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी सुद्धा लाखो रुपयांचा खर्च येतो. अपघातामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होते. काही सामान्य नियम न पाळल्याने हे अपघात होत असतात. अपघातमुक्त जिल्हा व्हावा व वाहतूक नियमांची माहिती, वाहन चालविताना घ्यायची काळजी हा विषय जिल्हावासीयांसमोर यावा म्हणून चालक …
 
“शिवकृपा’च्या नितीन सोनटक्केंनी बुलडाणेकरांना दिलाय अपघात टाळण्याचा “मंत्र’; विशेष मुलाखतीत सांगितले ट्रिपल “ओ’चे गौडबंगाल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना घडतात. त्यात अनेकांचा जीव जातो. जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी सुद्धा लाखो रुपयांचा खर्च येतो. अपघातामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होते. काही सामान्य नियम न पाळल्याने हे अपघात होत असतात. अपघातमुक्त जिल्हा व्हावा व वाहतूक नियमांची माहिती, वाहन चालविताना घ्यायची काळजी हा विषय जिल्हावासीयांसमोर यावा म्हणून चालक दिनाचे औचित्य साधून बुलडाणा लाइव्ह कार्यालयात शिवकृपा डायव्हिंग स्‍कूलचे संचालक नितीन सोनटक्के यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अपघात कसे टाळावे, वाहतुकीचे नियम कोणते व ते कसे पालन करावे याची माहिती सविस्तर दिली…

नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती नसल्याने अपघात होतात, असे ते म्हणाले. रस्त्यावर लागलेल्या चिन्हांची माहिती चालकाला असली पाहिजे. चालकाचे वाहनावर नियंत्रण असले पाहिजे. वाहन चालवत असताना लायसन्स, पीयूसी प्रमाणपत्र, गाडीची कागदपत्रे सोबत असावीत. अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहन देऊ नये. एखादे वाहन चालविताना अचानक अनियंत्रित झाले किंवा त्याचे ब्रेक फेल झाले तर गाडीचा वेग गिअरने कंट्रोल करावा, अशा वेळेस गाडी गर्दीत न नेता वर्दळ नसलेल्या रस्त्याने न्यावी. मोकळ्या जागेत किंवा गाडीचे चाक फसून गाडी थांबेल अशा ठिकाणी नेऊन गाडी थांबवावी. ओव्हरस्पीड,ओव्हरलोड आणि ओव्हर लोड वाहन चालवू नये. प्रवासाला निघताना गाडीच्या चाकातील हवा, ब्रेक, इंजिन आदी बाबी व्यवस्थित असल्याची खात्री करूनच प्रवासाला निघावे, असे नितीन सोनटक्के यांनी सांगितले.
सविस्तर मुलाखत बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://youtu.be/GxKzR064CRs