जिल्ह्यात पाच दिवसांत ६ तरुणी, महिला बेपत्ता; ५ पुरुषही गेले घर सोडून!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात महिला, पुरुष, तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल ११ जण बेपत्ता झाले असून, यात सहा तरुणी, महिला तर ५ पुरुषांचा समावेश आहे. विशीच्या आतील मुलींचे गेल्या काही महिन्यांत वाढलेले पलायन चिंतेची बाब ठरत आहे.
सवडद (ता. सिंदखेड राजा) येथील निशा उर्फ बबली रामदास मोरे ही २० वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. तिचा बराच शोध घेऊनही मिळून न आल्याने अखेर काल, २५ ऑगस्टला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तिच्या घरच्यांनी हरवल्याची तक्रार दिली. रेणुका शंकर बाजोडे (२८, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) ही घरातून बेपत्ता झाल्याची नोंद २३ ऑगस्टला जळगाव जामाेद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याच दिवशी राधा संदीप वोवाळकर (३५, रा. नांदुरा) ही घरातून निघून गेल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात तिच्या घरच्यांनी दिली आहे.
मलकापूरच्या तहसील चौकातून नेहा गोपाल वराडे ही १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस ठाण्यात २२ ऑगस्टला करण्यात आली. याच दिवशी माटरगाव (ता. शेगाव) येथील कु. विजया बळीराम इंगळे ही २२ वर्षीय तरुणी घर सोडून गेली आहे. ती हरवल्याची नोंद जलंब पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पांग्रा डोळे (ता. लोणार) येथून कु. मनिषा जनार्धन धांडे ही २० वर्षीय तरुणी घरी कुणाला काही न सांगता बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची नोंद २१ ऑगस्टला लोणार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
५ दिवसांत हे पुरुष बेपत्ता…
अनिल भीमराव अंभोरे (४०, रा. कोला, ता. चिखली), श्रीकृष्ण सारंगधर गायकवाड (२४, रा. गाडेगाव खुर्द, जळगाव जामोद), रघुनाथ शंकर माठे (४५, रा. पिंपळगाव जळगाव जामोद), सुरेश ज्ञानेश्वर खंडारे (३२, रा. उंद्री, ता. चिखली)