खराब रस्‍त्‍यामुळे पत्रकारासह दोघे जखमी; शेगाव- नागझरी रस्‍ता आणखी किती अपघात घडवणार?

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खराब रस्त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी झाले. ही घटना शेगाव- नागझरी दरम्यान काल, २२ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. पत्रकार राजकुमार व्यास यांना अपघातात गंभीर मार लागला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी ब्राह्मण समाजात नदीकाठी श्रावणीची पूजा करून जाणव्याची तसेच ॠषी पूजा करून होमहवन केले जाते. पूजेत सहभागी होण्यासाठी …
 
खराब रस्‍त्‍यामुळे पत्रकारासह दोघे जखमी; शेगाव- नागझरी रस्‍ता आणखी किती अपघात घडवणार?

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खराब रस्त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी झाले. ही घटना शेगाव- नागझरी दरम्यान काल, २२ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. पत्रकार राजकुमार व्यास यांना अपघातात गंभीर मार लागला आहे.

रक्षाबंधनच्या दिवशी ब्राह्मण समाजात नदीकाठी श्रावणीची पूजा करून जाणव्याची तसेच ॠषी पूजा करून होमहवन केले जाते. पूजेत सहभागी होण्यासाठी शेगावपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील नागझरी शिवारातील नदीपात्राच्‍या स्थळी व्यास हे शहरातीलच गोपाल शर्मा यांच्या दुचाकीवर बसून जात होते. खराब रस्‍त्‍यामुळे त्‍यांची दुचाकी घसरून अपघात झाला. दोघेही जखमी झाले.

व्यास यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. शेतमजूर राष्ट्रपाल सरदार, नीलेश मसने, मंगेश गणगणे शेतातून शेगावकडे घरी परतत असताना त्यांना जखमी झालेले शर्मा अाणि व्यास दिसले. त्‍यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांना उपचारासाठी दुचाकीवरून रुग्‍णालयात आणले. व्‍यास यांच्‍या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून, जेवणास अडचण येत असल्याने लिक्वीड स्वरुपात अन्‍न घ्यावे लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार संजय सोनोने, अनिल ऊंबरकार यांनी व्यास यांची भेट घेऊन शक्य ती मदत पत्रकारांच्या माध्यमातून व्यास यांना करण्यात येईल, असे सांगितले.