इन्‍स्‍टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून दोघांचे फोटो पती-पत्‍नी म्‍हणून केले व्हायरल!; तरुणाचे कृत्‍य, चिखली तालुक्‍यातील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १९ वर्षीय तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावर दोघांचे फोटो पती-पत्नी म्हणून टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणाने तिच्या घरासमोर येऊन तिचा हात धरून विनयभंग केला. ही घटना उंद्री (ता. चिखली) येथे समोर आली आहे. धीरज सुभाष इंगळे (रा. घाणेगाव) असे आरोपी तरुणाचे …
 
इन्‍स्‍टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून दोघांचे फोटो पती-पत्‍नी म्‍हणून केले व्हायरल!; तरुणाचे कृत्‍य, चिखली तालुक्‍यातील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १९ वर्षीय तरुणीचे इन्‍स्‍टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्‍यावर दोघांचे फोटो पती-पत्‍नी म्‍हणून टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. एवढ्यावरच न थांबता तरुणाने तिच्‍या घरासमोर येऊन तिचा हात धरून विनयभंग केला. ही घटना उंद्री (ता. चिखली) येथे समोर आली आहे.

धीरज सुभाष इंगळे (रा. घाणेगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. माझे तुझे प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्‍न करायचे आहे, असे म्‍हणून त्‍याने तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्‍न केला. तिला न विचारता तिचे इन्‍स्‍टाग्रामवर खातेही उघडले. २६ ऑगस्‍टला तिच्‍या घरासमोर आला आणि हात धरला, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी धीरजविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.