दाजिबाचं गिफ्‍ट सालीला भलतंच पडलं महागात; कारमध्ये बलात्‍कार!; चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सालीच्या वाढदिवसाला तो भेटायला आला… गिफ्ट घेऊन देतो म्हणून तिला बाजारात घेऊन गेला… तेथून एका कारमध्ये जालन्याकडे नेले अन् गाडीतच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जालन्यात गेल्यावर सालीला स्वतःच्या घरासमोर सोडून दिले अन् फरार झाला… ही धक्कादायक घटना २० ऑगस्ट रोजी घडली असून, २४ ऑगस्टला चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, …
 
दाजिबाचं गिफ्‍ट सालीला भलतंच पडलं महागात; कारमध्ये बलात्‍कार!; चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सालीच्या वाढदिवसाला तो भेटायला आला… गिफ्ट घेऊन देतो म्हणून तिला बाजारात घेऊन गेला… तेथून एका कारमध्ये जालन्याकडे नेले अन्‌ गाडीतच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जालन्यात गेल्यावर सालीला स्वतःच्या घरासमोर सोडून दिले अन्‌ फरार झाला… ही धक्‍कादायक घटना २० ऑगस्ट रोजी घडली असून, २४ ऑगस्टला चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपी अद्यापही फरारीच आहे.

चिखली शहरातील माळीपुरा भागातील एका १६ वर्षीय मुलीचा २० ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. वाढदिवसासाठी तिचा जालना येथील दाजी चिखलीला आला होता. तिला गिफ्ट घेऊन देतो म्हणून चिखली शहरातील डीपी रोडवर घेऊन गेला. गिफ्ट घेतल्यानंतर घरी न जाता त्याने मोटारसायकल मेहकर फाट्याकडे वळविली. चिखली शहरातील शिवाजी उद्यानामागे आधीपासूनच एक कार उभी होती. त्याने सालीचे तोंड दाबत तिला कारमध्ये टाकले. चालकाने कार सुसाट जालन्याकडे पळविली. कारमध्येच मेव्हण्याने सालीवर लैंगिक अत्याचार केला. जालना येथे गेल्यानंतर त्याने लॉजवर रूम करण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पवयीन सालीचे आधारकार्ड सोबत नसल्याने त्याला लॉजवर रूम मिळाली नाही. त्यानंतर त्याने पुन्हा दुसऱ्यांदा कारमध्ये सालीवर अत्याचार केला.

दरम्यान त्याच्या फोनवर सतत त्याच्या बायकोचे म्हणजेच सालीच्या मोठ्या बहिणीचे फोन येत होते. त्यामुळे त्याने सालीला त्याच्या घरासमोर सोडून दिले व तो फरार झाला. सालीने बहिणीला हकीकत सांगितली. रात्रीच ही माहिती चिखली येथील तिच्या आई- वडिलांना कळाली. तिचे आई- वडील रात्रीच जालना येथे दाखल झाले. दुसऱ्या दिवशी अल्पवयीन पीडित मुलगी, तिची मोठी बहीण, आई -वडील चिखली येथे आले. या घटनेने सर्वच घाबरले होते. २४ ऑगस्‍टला पीडित मुलीने चिखली शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून २८ वर्षीय मेव्हण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत असून सध्या तो त्याच्या आईसह फरार आहे. पोलिसांनी अनेकदा पथके पाठवूनही तो हाती लागला नाही.