उंदीर मारण्याचे औषध पिऊन वृद्धाची आत्महत्या; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा उपचारादरम्यान आज, १४ ऑगस्ट रोजी पहाटे मृत्यू झाला. श्रीराम रावजी महाकाळे (७३, रा. वामननगर, खामगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. महाकाळे यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास उंदीर मारण्याचे विषारी पिले होते. ही बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांना लगेच …
 
उंदीर मारण्याचे औषध पिऊन वृद्धाची आत्महत्या; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा उपचारादरम्यान आज, १४ ऑगस्ट रोजी पहाटे मृत्यू झाला. श्रीराम रावजी महाकाळे (७३, रा. वामननगर, खामगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. महाकाळे यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास उंदीर मारण्याचे विषारी पिले होते. ही बाब कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांना लगेच शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज, १४ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.