सचिन वाझेंना सेवेत घ्या म्हणून शिवसेनेचा होता दबाव

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोटमुंबई : सध्या अनेक प्रकरणांत वादग्रस्त ठरलेले अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी आपल्याला साकडे घातले होते, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून वाझेंसाठी मनधरणी करणारे ते नेते कोण? असा प्रश्न …
 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
मुंबई :
सध्या अनेक प्रकरणांत वादग्रस्त ठरलेले अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी आपल्याला साकडे घातले होते, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून वाझेंसाठी मनधरणी करणारे ते नेते कोण? असा प्रश्न चर्चिला जात आहे. वास्तविक सचिन वाझे हे तेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित झाले होते. तरीही शिवसेनेचे काही नेते त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी आग्रही होते.मात्र, त्यावेळी आपण अ‍ॅडव्होकेट जनरलचे मत घेतले. त्यांनी वाझेंना सेवेत घेऊ नये असा सल्ला दिला. त्यामुळे आपण शिवसेना नेत्यांचे म्हणणे ऐकले नाही व वाझेंना सेवेत घेतले नाही, असे फडणवीस म्हणाले. ठाकरे सरकारच्या काळात एकाच पोलीस अधिकार्‍यावर सातत्याने महत्वपूर्ण दिले जात असल्याबद्दलही फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांचा रोख सचिन वाझे यांच्याकडेच होता.