वारंवार अपयश येऊनही आणखी एक प्रयत्‍न; वेगळ्या विदर्भासाठी नव्या राजकीय पक्षाची स्थापना!

नागपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनाधार मिळत नसला तरी विदर्भवाद्यांची वेगळ्या विदर्भाची मागणी काही कमी होत नाही. आता या मागणीसाठी नव्या पक्षाचीच स्थापना करण्यात आली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून विदर्भ राज्य आंदोलन समितीने जय विदर्भ पार्टी हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. यापूर्वी विदर्भ जनता काँग्रेस, विदर्भ राज्य पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ …
 
वारंवार अपयश येऊनही आणखी एक प्रयत्‍न; वेगळ्या विदर्भासाठी नव्या राजकीय पक्षाची स्थापना!

नागपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनाधार मिळत नसला तरी विदर्भवाद्यांची वेगळ्या विदर्भाची मागणी काही कमी होत नाही. आता या मागणीसाठी नव्या पक्षाचीच स्‍थापना करण्यात आली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून विदर्भ राज्य आंदोलन समितीने जय विदर्भ पार्टी हा नवा राजकीय पक्ष स्‍थापन केला आहे.

यापूर्वी विदर्भ जनता काँग्रेस, विदर्भ राज्य पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा अशा अनेक पक्ष व संघटनांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर निवडणुकांमध्ये प्रयत्न केले होते. मात्र या प्रयत्नांना यश आले नव्हते. विदर्भ राज्य आंदोलन समितीने घोषणा केलेला जय विदर्भ पार्टी हा राजकीय पक्ष सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखणे, मेळघाटातील कुपोषण, बेरोजगारी, माओवाद, अपूर्ण सिंचन प्रकल्प करणे यासाठी वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी रेटणे हा या पक्षाचा मुख्य हेतू आहे, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राम येवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.