पाणीपुरी बेतली जिवावर; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील घटना; ७८ जणांना झाली विषबाधा भंडारा : पाणीपुरी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. विशेषत: महिलांचा हा हॉटफेव्हरिट खाद्यपदार्थ. पण भंडारा जिल्ह्यात भेंडाळा (ता.पवनी) येथे आठवडी बाजारात पाणीपुरी खाणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ७८ जणांना विषबाधा झाली असून त्यात ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे या ११ वर्षीय मुलीला जीव गमवावा …
 

भंडारा जिल्ह्यातील घटना; ७८ जणांना झाली विषबाधा

भंडारा : पाणीपुरी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. विशेषत: महिलांचा हा हॉटफेव्हरिट खाद्यपदार्थ. पण भंडारा जिल्ह्यात भेंडाळा (ता.पवनी) येथे आठवडी बाजारात पाणीपुरी खाणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ७८ जणांना विषबाधा झाली असून त्यात ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे या ११ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे. ज्ञानेश्वरी पाचवीत शिकत होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. असा त्रास होणार्‍यांच संख्या वरचेवर वाढतच गेल्याने आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने भेंडाळा गावात धाव घेऊन तेथेच आरोग्य उपचार शिबिर सुरू केले आहे. तर गंभीर प्रकृती असलेल्या १९ जणांना भंडार्‍याला हलविण्यात आले आहे.मळमळ, उलटीचा त्रास होऊनही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने किंवा घरगुती उपचार केल्याने प्रकरण गंभीर बनले. पाणीपुरी खाल्लेल्या ज्ञानेश्वरीला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली व तिचा मृत्यू झाल्यानंतर गाव आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस आता त्या पाणीपुरीवाल्याचा शोध घेत आहेत.