चिमुरडीवर अत्याचार; नराधम आरोपीस फाशीची शिक्षा

नांदेड जिल्ह्यातील घटना; भोकर न्यायालयात ६४ दिवसांत प्रकरण निकालीनांदेड : शेतमालकाच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणार्या नराधम सालगड्यास न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील असून पोलीस तपास पूर्ण होऊन भोकर न्यायालयाने अवघ्या ६४ दिवसांत आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.या प्रकरणाचा घटनाक्रम असा की, भोकर तालुक्यात (जि.नांदेड) २० जानेवारी …
 

नांदेड जिल्ह्यातील घटना; भोकर न्यायालयात ६४ दिवसांत प्रकरण निकाली
नांदेड :
शेतमालकाच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणार्‍या नराधम सालगड्यास न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील असून पोलीस तपास पूर्ण होऊन भोकर न्यायालयाने अवघ्या ६४ दिवसांत आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणाचा घटनाक्रम असा की, भोकर तालुक्यात (जि.नांदेड) २० जानेवारी २०२१ रोजी एका पाच वर्षीय चिमुरडीवर सालगड्याने लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. बाबूराव संगेवार असे या आरोपीचे नाव आहे. तो एका शेतात सालगडी म्हणून कामाला होता. त्याने आपल्याच शेतमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीला वासनेचा शिकार बनविले. त्यानंतर तिची हत्या केली. मुलगी घरी आली नाही म्हणून शोधाशोध केल्यानंतर शेतात तिचा मृतदेह आढळला. आरोपी सालगडीही घटनास्थळाजवळच होता.घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला घेरले होते. पण पोलिसांनी जमावाच्या तावडीतून त्याची सुटका केली. त्यानंतर अवघ्या १९ दिवसांत तपास पूर्ण करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले. नियमित सुनावणी होऊन न्यायालयानेही अतिशय कमी वेळेत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.