खाली जेवणाच्या पंगती अन्‌ वरच्या मजल्यावर “भलताच’ कार्यक्रम; महिलेला जेवायला बोलावून तिच्यासोबत केले ते कृत्य

अहमदनगर : गणेशोत्सवानिमित्त विवाहित महिलेला घरी जेवणाचे आमंत्रण दिले. ती जेवायला आली असता तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. विवाहितेने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विशाल सोपान शेटे(३६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विशाल शेटे आणि पीडित महिला जवळचे नातेवाईक आहेत. विशालच्या घरी गणेशोत्सवानिमित्त …
 
खाली जेवणाच्या पंगती अन्‌ वरच्या मजल्यावर “भलताच’ कार्यक्रम; महिलेला जेवायला बोलावून तिच्यासोबत केले ते कृत्य

अहमदनगर : गणेशोत्सवानिमित्त विवाहित महिलेला घरी जेवणाचे आमंत्रण दिले. ती जेवायला आली असता तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. विवाहितेने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विशाल सोपान शेटे(३६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी विशाल शेटे आणि पीडित महिला जवळचे नातेवाईक आहेत. विशालच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भंडारा होता. त्याने ३० वर्षीय नातेवाइक महिलेला जेवायला बोलावले होते. खालच्या मजल्यावर जेवणाच्या पंगती बसलेल्या असताना महिला झाडू आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. विशाल तिच्यामागे वरच्या मजल्यावर गेला. त्याने महिलेला खोलीत ओढले.

दरवाजा बंद करून अत्याचार केला. मी जेव्हा रात्री तुझ्या घरी येईल तेव्हा दरवाजा उघडा ठेवत जा, असेही त्याने महिलेला धमकावले. वरच्या मजल्यावर हा प्रकार घडत असताना खाली जेवणाच्या पंगती सुरू होत्या. खाली गेल्यानंतर झाडू आणायला “उशीर का झाला असे कुणी विचारले तर मोबाईल वर बोलत होते असे सांग’, असेही विशालने महिलेला धमकावले. मात्र खाली गेल्यानंतर महिलेने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे कळताच आरोपी विशाल थेटे हा फरार झाला.