केमिकल कारखान्यात स्फोट; सहा कामगार ठार

रत्नागिरी एमआयडीसीतील दुर्घटनारत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीचा परिसर शनिवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. या स्फोटत किमान सहा कामगार ठार झाले असून कारखान्यात आणखी ३५ ते ४० जण अडकले असल्याचे समजते. लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीत ही दुर्घटना घडली. ही या परिसरातील सर्वात मोठी केमिकल कंपनी असून तेथे एका मागोमाग …
 

रत्नागिरी एमआयडीसीतील दुर्घटना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीचा परिसर शनिवारी सकाळी भीषण स्फोटाने हादरला. या स्फोटत किमान सहा कामगार ठार झाले असून कारखान्यात आणखी ३५ ते ४० जण अडकले असल्याचे समजते. लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीत ही दुर्घटना घडली. ही या परिसरातील सर्वात मोठी केमिकल कंपनी असून तेथे एका मागोमाग असे दोन स्फोट झाले. स्फोटानंतर कारखान्याच्या आतील परिसर आगीने वेढला गेला. धुराचे लोट उठले. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. त्यात काही कामगार जखमी झाले.जखमींना खेडच्या रुग्णालयात तसेच गंभीर जखमींना मुंबईला हलविण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.स्फोटानंतर कारखान्यात आग लागून सहा कामगार होरपळले व गंभीररित्या भाजले गेले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. घरडा कंपनीतील बॉयलर अतिशय गरम होऊन त्याचा स्फोट झाला असावा व कारखाना परिसराला आग लागली असावी, असे समजते. दरम्यान खेड एमआडीसीत गेल्या वर्षभरात घडलेली ही सहावी मोठी दुर्घटना असल्याचे समजते. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.