लैंगिक अत्याचारासाठी केला "नवस'!; व्हिडिओ काढून मग विवाहितेवर वारंवार जबरदस्ती!!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ३० वर्षीय विवाहिता रांजणगावात पतीसह राहते. नितीन हा विवाहितेच्या पतीचा मित्र आहे. ८ एप्रिल २०२१ रोजी रात्री नऊच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असताना नितीन घरी आला होता. माझा नवस पूर्ण झाला... असे म्हणत त्याने त्याच्याकडील बॉक्समधील पेढा विवाहितेला दिला. पेढा खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर नितीनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
तिला जाग आल्यानंतर तिने याबाबत विचारणा केली असता त्याने तिला व्हिडिओ दाखवत तू माझ्या मर्जीप्रमाणे वागली नाही तर तुला आणि तुझ्या कुटूंबाला जिवे मारेन. व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने या प्रकाराची कुठे वाच्यता केली नाही. त्यानंतर नितीनने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून विवाहितेने घडलेली हकीकत पतीला सांगितली. पतीने तिला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचा तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करत आहेत.