सुनेचा अंघोळ करताना व्हिडिओ काढला; तिला ब्लॅकमेल करत म्हणाला, माझ्या पोराचाने काही होणार नाही, मीच तुला मूल देतो..!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी घरी कुणी नसताना सासऱ्याने सुनेशी जवळीक करून शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सून ओरडू लागल्याने सासऱ्याने सोडून दिले. ही बाब तिने पतीला सांगितली. मात्र बापाचाच पराक्रम असल्याने नवऱ्याने बायकोचीच समजूत काढून प्रकरण तात्पुरते मिटवले. २० डिसेंबर रोजी सकाळी सून बाथरूममध्ये अंघोळ करत असताना सासऱ्याने चोरून तिचा व्हिडिओ तयार केला होता.
हा व्हिडिओ तिला दाखवून माझ्या पोराच्याने काही जमणार नाही. मीच तुला मूल देतो, असे म्हणत सासरच्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. सुनेने फोन लावण्याच्या उद्देशाने सासऱ्याचा मोबाइल घेतला व व्हिडिओ पाहिला. त्यानंतर सुनेने थेट माहेर गाठले. आई- वडील व भावाला हा प्रकार सांगून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.