मोलकरणीवर प्रेमाचे जाळे; वारंवार शरीरसंबंध, व्हिडिओ काढून केला व्हायरल, वकिलाचा कारनामा!

 
जळगाव : वकील म्हणजे कायद्याची लढाई करून सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणारा... मात्र जळगावात एका वकिलाचा भलताच कारनामा समोर आला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर या वकिलाची वाईट नजर पडली. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिच्याशी शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ तयार केला. नंतर हे व्हिडिओ व्हायरल केले. अनैतिक संबंध चव्हाट्यावर आल्याने पीडितेने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून वकिलाविरुद्ध तक्रार दिली. या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर, जळगाव) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरीण म्हणून काम करत होती. त्‍याने तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबंध तयार केले. मोलकरणीच्या नवऱ्यालासुद्धा त्‍याने तुझ्या बायकोवर माझे प्रेम असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेच्या पतीने तिच्याशी नाते तोडले. त्यामुळे वकिलाला मोकळीक मिळाली होती.

तिच्या असाह्यतेचा फायदा घेत वकिलाने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्‍याने ते व्हिडिओ व्हायरल करून तिची बदनामी केली. अखेर काल, २२ डिसेंबर रोजी पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सरकारी वकील असताना या वकिलाविरुद्ध एसीबीने सुद्धा कारवाई केली होती.