अजबच... रतन टाटांचे भाऊ दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलपासून दोन हात दूर...

 
मुंबई : रतन टाटा हे नाव माहीत नाही असा व्यक्ती भारतात शोधूनही सापडणार नाही. देशातील सर्वाधिक सन्मानित उद्योगपती म्हणून संपूर्ण देश रतन टाटांना ओळखतो. मोठी संपत्ती असूनही रतन टाटा मात्र साधे राहणे पसंत करतात. रतन टाटांचे लहान भाऊ असलेले जिमी टाटा यांना मात्र खूप कमी लोक ओळखतात. मुंबईच्या कुलाबा भागात जिमी टाटा दोन बेडरूमच्या एका साध्या फ्लॅटमध्ये राहतात. रतन टाटा यांच्याप्रमाणे तेसुद्धा अविवाहित आहेत.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी जिमी टाटा यांचा एक फोटो शेअर करत व्टिट केले. तुम्ही रतन टाटांचे लहान भाऊ जिमी टाटा यांना ओळखता? कुलाबा भागात ते दोन बेडरूमच्या घरात राहतात. व्यवसायात त्यांना फारसा रस नाही. स्क्वॅशचे चांगले खेळाडू आहेत. ते माझा नेहमी पराभव करतात असे व्टिट गोयंका यांनी केले आहे. जिमी टाटा ९० च्या दशकात रिटायर्ड झाले. निवृत्तीपूर्वी त्यांनी टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांत काम केले. टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांचे ते शेअरधारक सुद्धा आहेत. यासोबतच सर रतन टाटा ग्रुपचे ते विश्वस्त आहेत. ते मोबाइल जवळ बाळगत नाहीत. वर्तमानपत्राच्या माध्यमातून जगात काय सुरू याची माहिती त्यांना मिळते.