State News : १० हजार गेले, लैंगिक अत्‍याचारही सहन केला… पण पैशांचा पाऊस काही पडलाच नाही!; २६ वर्षीय विवाहितेची पोलिसांत धाव, २ ढोंबी बाबांना बेड्या!!

मुंबई ः १० हजार रुपये घेतले, वरून बलात्कारही केला… पण पैशांचा पाऊस काही पडलाच नाही! अखेर चौघींपैकी एकीने पालघर पोलिसांकडे जाऊन फिर्याद मांडली. पोलिसांनी दोन ढोंगी बाबांना अटक केली आहे. अन्य तीन महिला मात्र तक्रारीसाठी समोर आल्या नाहीत. पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये हा प्रकार समोर आला आहे. आमच्यात दैवी शक्ती असून, पैशांचा पाऊस पाडू शकतो. अर्नाला …
 
State News : १० हजार गेले, लैंगिक अत्‍याचारही सहन केला… पण पैशांचा पाऊस काही पडलाच नाही!; २६ वर्षीय विवाहितेची पोलिसांत धाव, २ ढोंबी बाबांना बेड्या!!

मुंबई ः १० हजार रुपये घेतले, वरून बलात्‍कारही केला… पण पैशांचा पाऊस काही पडलाच नाही! अखेर चौघींपैकी एकीने पालघर पोलिसांकडे जाऊन फिर्याद मांडली. पोलिसांनी दोन ढोंगी बाबांना अटक केली आहे. अन्य तीन महिला मात्र तक्रारीसाठी समोर आल्या नाहीत. पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

आमच्यात दैवी शक्ती असून, पैशांचा पाऊस पाडू शकतो. अर्नाला कोस्टल पोलिसांनी २६ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला. मॅथ्यू पंडियान आणि दिनेश देवरुखकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी करू. हा विधी केला तर पैशांचा पाऊस पडेल. तुम्हाला २६० कोटी रुपये देऊ, असे आमिष या चार महिलांना आरोपींनी दाखवले होते. एक महिला राजी झाल्यानंतर आणखी ३ महिलांना या विधीसाठी तयार करण्यात आले.

पूजेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून १० हजार रुपये घेण्यात आले. पूजा केल्यानंतर या महिलांवर बलात्‍कार करण्यात आला. मात्र पैसे गेले, बलात्‍कारही करून झाला तरी पैशांचा पाऊस काही पडला नाही. हा घटनाक्रम जुलै, ऑगस्‍टमध्ये घडला. मात्र तक्रारीसाठी कुणी पुढे न आल्याने वाच्यता झाली नव्‍हती. मात्र चौघींपैकी एका तरुणीने धाडस करून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून तातडीने आरोपींना अटक केली. अन्य ३ महिला मात्र बदनामीच्‍या भीतीने तक्रार करण्यास कचरत असल्याचे दिसून येते.