State News ः नागपुरातील तरुणीसोबत जे झाले, ते ऐकून तुम्‍हाला धक्‍का बसेल… पण ते सर्व तिनं सोसलंय… लग्‍नाच्‍या आमिषाने वारंवार लैंगिक अत्‍याचार, प्रेग्‍नंट राहिल्यावर यू ट्यूब पाहून गर्भ पाडण्याचा सल्ला, नंतर लग्‍नास नकार!; तपास केला तर आधीच त्‍याचे दोन लग्‍न झाल्याचे समोर!!

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे घाबरलेल्या प्रियकराने यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहून गर्भपात कर, असा सल्ला तिला दिला. त्यानंतरही त्याने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल खान (२४, रा. नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातील यशोदानगर …
 
State News ः नागपुरातील तरुणीसोबत जे झाले, ते ऐकून तुम्‍हाला धक्‍का बसेल… पण ते सर्व तिनं सोसलंय… लग्‍नाच्‍या आमिषाने वारंवार लैंगिक अत्‍याचार, प्रेग्‍नंट राहिल्यावर यू ट्यूब पाहून गर्भ पाडण्याचा सल्ला, नंतर लग्‍नास नकार!; तपास केला तर आधीच त्‍याचे दोन लग्‍न झाल्याचे समोर!!

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. त्‍यामुळे घाबरलेल्या प्रियकराने यू ट्यूबवरील व्हिडिओ पाहून गर्भपात कर, असा सल्ला तिला दिला. त्यानंतरही त्याने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल खान (२४, रा. नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातील यशोदानगर भागात ही घटना उघडकीस आली आहे.

सोहेल खानचे २४ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करायचा. मागील ५ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. यातून तरुणी गर्भवती राहिली. तिने नागपुरातील डागा हॉस्पिटलमध्ये गर्भवती असल्याची नोंदही केली व त्यात सोहेल खान पती असल्याचा उल्लेख केला. १० ऑगस्ट रोजी तिच्या घरातील लोक बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चक्कर येऊन ती पडल्याने बाळाचा मृत्यू झाला असावा, असे तिला वाटले. सोहेलला फोन करून तिने माहिती दिली.

तेव्हा यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून गर्भापात कर, असा सल्ला सोहेलने दिला. तिने व्हिडिओ पाहून बाळ बाहेर काढले. कैचीने बाळाची नाळ कापली. त्यानंतर सोहेल तिथे आला. सोहेलने बाळाला स्मशानघाटात पुरले. मुलीचे नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांना घरात डॉक्टर डागा हॉस्पिटलची फाईल दिसली. तरुणीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेनंतर सोहेल खानने तिच्याशी लग्नाला नकार दिल्याने यशोदानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोहेलविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात सोहेलचे आधीच दोन लग्न झाले असल्याची बाब समोर आल्याने पीडित तरुणीला धक्का बसला आहे.