State News ः एकतर्फी प्रेमातून युवतीला स्वयंपाकघरात कोंडले; वर्गमित्र होते, पती घरी नसताना यायचा…

नागपूर : एकतर्फी प्रेमप्रकरणातून कोण काय करेल याचा नेम नाही. नागपुरात युवतीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिला स्वयंपाक घरात कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिची सुटका केली असून आरोपी मोनू आडकीने(३२,रा जयभीम चौक, नागपूर) याला अटक केली आहे. मोनू महानगरपालिकेचा स्वच्छता कर्मचारी आहे. तो कचरा गोळा करण्याचे काम करतो. …
 
State News ः एकतर्फी प्रेमातून युवतीला स्वयंपाकघरात कोंडले; वर्गमित्र होते, पती घरी नसताना यायचा…

नागपूर : एकतर्फी प्रेमप्रकरणातून कोण काय करेल याचा नेम नाही. नागपुरात युवतीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याने तिला स्वयंपाक घरात कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिची सुटका केली असून आरोपी मोनू आडकीने(३२,रा जयभीम चौक, नागपूर) याला अटक केली आहे. मोनू महानगरपालिकेचा स्वच्‍छता कर्मचारी आहे. तो कचरा गोळा करण्याचे काम करतो. त्याचे लग्न झाले असून, त्याला दोन मुलं आहेत. दुसरीकडे पीडित महिलेचे सुद्धा लग्न झाले असून, तिलाही दोन मुलं आहेत.

मोनू असा पडला तिच्या प्रेमात…
एक दिवस मोनू रस्त्यावर कचरा गोळा करण्याचे काम करत होता. त्याचवेळी पीडित महिला पतीची तब्येत बिघडल्याने घाईघाईत त्याला रुग्णालयात घेऊन जात होती. मोनूचे तिच्याकडे लक्ष गेलं. चेहरा ओळखीचा वाटल्याने मोनूने तिला थांबवलं. विचारपूस करून ओळख निघाली, तेव्हा दोघे लहानपणी एकाच शाळेतील एकाच वर्गातील मित्र असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेने विश्वासाने मोनुशी संवाद साधला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने मोनूने तिच्याघरी येणं-जाणं सुरू केले.

वर्गमित्र असल्याने महिलेला यात काही वेगळं वाढलं नाही. मात्र नंतर मोनू तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. एक दिवस तिचा पती घरी नसताना मुलांसमोरच मोनूने तिच्याकडे लग्नाची मागणी केली. तिने नकार दिल्याने मोनूने तिला स्वयंपाक घरात डांबून ठेवले. नागपुरातील कपिलनगर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मोनुला अटक करण्यात आली आहे.