STATE NEWS : धक्कादायक! गर्लफ्रेंडवर अत्याचार करू देण्यासाठी बॉयफ्रेंड घ्यायचा ५०० रुपये!

नागपूर : स्वतःच्या गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार करू देण्यासाठी बॉयफ्रेंड त्याच्या मित्रांकडून ५०० रुपये घेत होता. याप्रकरणी आरोपी तरुण आणि त्याच्या मित्रांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे. आकाश भंडारी, संदीप पांढरे, अजय सुरणकर आणि फिरोज शेख अशी अत्याचार करणाऱ्यांची नावे आहेत. पीडिता १६ …
 
STATE NEWS : धक्कादायक! गर्लफ्रेंडवर अत्याचार करू देण्यासाठी बॉयफ्रेंड घ्यायचा ५०० रुपये!

नागपूर : स्वतःच्या गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार करू देण्यासाठी बॉयफ्रेंड त्याच्या मित्रांकडून ५०० रुपये घेत होता. याप्रकरणी आरोपी तरुण आणि त्याच्या मित्रांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे.

आकाश भंडारी, संदीप पांढरे, अजय सुरणकर आणि फिरोज शेख अशी अत्याचार करणाऱ्यांची नावे आहेत. पीडिता १६ वर्षांची आहे. तिचे आई- वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. आरोपीसुद्धा हातमजुरी करतात. आकाश आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. आकाश लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवत होता. याशिवाय आकाशचे इतर मित्रसुद्धा तिच्‍यावर लैंगिक अत्याचार करत होते. आकाश स्वतः त्याच्या मित्रांना तसे करू देत होता. त्यासाठी एका दिवसाचे ५०० रुपये तो मित्रांकडून घेत होता. अत्याचार सतत वाढत गेल्याने पीडित मुलीने आईसह एमआयडीसी नागपूर पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आकाश व त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.