State News : गडचिरोलीच्या जंगलात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : नक्षलवादाच्या विरोधातील लढाईत सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात खोब्रा मेढा (ता.खेडा) जंगलात नक्षलवादी व सुरक्षा दलाच्या तुकडीसोबत जोरदार चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. सुरक्षा दलाच्या सूत्रांन सांगितले की, चकमकीच्यावेळी दोन्ह बाजूंनी जोरदार फायरिंग झाली.त्यात पाच नक्षलींचा खात्मा करण्यात आला. सध्या गोळीबार थांबला आहे. घटनेनंतर परिसरात सर्च अभियान राबविण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात दारूगोळा व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांचाही शोध घेण्यात येत आहे. याआधी पाच मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झडली होती. त्यात एक कमांडो शहीद झाला होता. तर काही जवान जखमी झाले होते. ती चकमक बारा तासांपेक्षा जास्त काळ चालली होती.