शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन
Jan 17, 2022, 12:53 IST
कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे आज, १७ जानेवारीला सकाळी कोल्हापूरमध्ये उपचारादरम्यान वृद्धापकळाने निधन झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
वातावरणातील बदलामुळे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात भरती केले होते. उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यांचे बोलणेही बंद झाले होते. पोटात अन्न-पाणीही जात नव्हते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्नही काम आले नाहीत. सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले होते. त्यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असून, त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए आणि एलएलबी शिक्षण त्यांनी घेतले होते. १९४८ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश घेतला होता.