गोव्याला गेलेल्या पतीला तिने व्हिडिओ कॉल केला... अर्धनग्न तरुणीसोबत दिसला नवरा!!; मग पुढे काय घडले वाचा...

 

नाशिक : नाशिकमध्ये एका वासनांध पतीचा कारनामा समोर आला आहे. बायकोला चांगली दिसत नाही म्‍हणून तो रात्री उशिरापर्यंत अश्लील व्हिडिओ पाहत बसायचा... गोव्याला एकटाच फिरायला गेला... तेव्हा पत्नीने व्हिडिओ कॉल केला तर एका अर्धनग्न महिलेने तो उचलला.. पत्‍नीने विचारले तर निर्लज्जपणे त्‍याने सांगून टाकले की प्रेयसीसोबत फिरायला आलो आहे. प्रेयसीसोबतचे फोटोही त्‍याने पत्नीला टाकले... त्‍यानंतर पत्‍नीला थेट घराबाहेर हाकलून दिले... विवाहितेने कळवण पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिचा पती तुषार गंगाधर पवार (दत्तनगर पेठ रोड, पंचवटी, नाशिक) याच्यासह त्‍याला पाठिंबा देणाऱ्या सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भारती तुषार पवार (२९) सध्या माहेरी निवाने (ता. कळवण, जि. नाशिक) येथे राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्यांची पॅकेजिंगची कंपनी आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये तिचे तुषारशी लग्न झाले. त्‍याने केवळ महिनाभर चांगले वागविले. नंतर मला तुझ्यात इंटरेस्ट नाही... तू चांगली दिसत नाहीस... तुझ्यासाठी माझेकडे वेळ नाही... असे म्हणत तुषार भारतीला छळू लागला. रात्री उशिरापर्यंत तो अश्लील व्हिडिओ पाहत होता. भारतीने याबद्दल सासूला सांगितले तर ती म्‍हणाली, "माझा मुलगा नवसाचा आहे. त्याला वाट्टेल ते करू दे. त्याच्या नांदी लागू नको...' नणंद म्‍हणे, तू आमच्या भावाला शोभत नाही... भारती गरोदर असताना आम्हाला तुझ्याकडून मूल नको असे म्हणत सासरच्यांनी तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या व गर्भपात केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी तुषार गोव्याला फिरायला गेला. तेव्हा भारतीने त्याला व्हिडिओ कॉल केला. 

तुषारसोबत एक अर्धनग्न महिला होती. ती बडबड करीत होती... तिने फोन ठेवून दिला, असेही तक्रारीत म्हटले आहे. गोव्यावरून परतल्यावर नवऱ्याला याबद्दल विचारले असता नवऱ्याने भारतीला गल्लीत बेदम मारहाण केली. तुषार एक दिवस लवकर घरी आला नाही तेव्हा भारतीने फोन केला असता प्रेयसीसोबत बाहेर आलो आहे, असे म्हणत त्याने प्रेयसीसोबतचे फोटो भारतीला व्हाॅटस ॲपवर पाठवले. घरी आल्यावर विचारणा केली असता पुन्हा लाथा- बुक्‍क्यांनी मारहाण केली. गल्लीतील लोकांनी तिला रुग्णालयात भरती केले. त्यानंतर तुषारने मला तुझ्यात इंटरेस्ट नाही असे म्हणत तिला माहेरी हाकलून लावले, तेव्हापासून ती माहेरी राहते. महिला तक्रार निवारण कक्षातही समझोता न झाल्याने भारती ने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती तुषार, सासरा गंगाधर पवार, सासू रजनी पवार, भाची मानसी शरद देवरे, नणंद तेजस्विनी उगले, नंदोई दिनेश उगले, पराग निकम, योगिता आहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.