कळशी द्यायला आला अन्‌ तिच्या थेट कपड्यांना हात घालत...

 
पुणे ः पुण्यातील गुलटेकडी भागात १५ वर्षीय मुलीच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी आलेल्या युवकाने मुलीसोबत अश्लील कृत्‍य करत विनयभंग केला. ही घटना काल, १० डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणात गणेश सुभाष हेगडे (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याला अटक केली आहे.

पीडित मुलगी पाणी भरत होती. गणेश कळशी देण्याच्या बहाण्याने घरात आला आणि तिला येथे खाली ओले करू नको, असे म्‍हणून त्‍याने तिच्या कंबरेत हात घातला. ती घाबरल्याने आरडाओरड करेल या भीतीने तो निघून गेला. मात्र पुन्हा १०-१५ मिनिटांनी परत आला आणि तुझी कळशी नळावर राहिली होती.

ती द्यायला आलो असे म्‍हणून त्‍याने तिचे तोंड दाबले आणि टीशर्ट वर करून विवस्त्र करण्याचा प्रयत्‍न केला. तिने त्‍याला धक्का देत घराबाहेर पळ काढला व शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी येईपर्यंत गणेश पळून गेला होता. स्वारगेट पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून तातडीने गणेशला अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. साबळे करत आहेत.