तोतया डॉक्टरकडून तरुणीचे ७ महिने सुरू होते लैंगिक शोषण!
आपण प्रसिद्ध ससून रुग्णालयात नोकरीला असून, स्वतःचे फार्मसी आणि नर्सिंग कॉलेज असल्याची थापही या तरुणाने तिला मारली होती. खोटे आयकार्ड, खोटी वैद्यकीय पदवीची कागदपत्रे त्याने तरुणीला दाखवली होती. त्याला तरुणी भुलली. तिचा विश्वास संपादन करून घरातील कौटुंबिक वादाचा फायदा उचलत जवळीक साधून त्याने तिच्याशी कधी त्याच्या घरी तर कधी तिच्या घरी, तर कधी बाहेर वारंवार जबरदस्ती लैंगिक प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नायका रुद्रा रमेशराव ऊर्फ किशन रमेशराव जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विमाननगर भागात राहतो. पिंपरीच्या तरुणीच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता. त्याचा फायदा तरुणाने उचलून तिच्या नातेवाइकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने १६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कमही उकळल्याचे तक्रारीत तरुणीने म्हटले आहे. मात्र नातेवाइकांना नोकरीला लावलेच नाही. पैसेही परत केले नाहीत. त्याने तिचे अश्लील व्हिडिओसुद्धा तयार केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तो तिचे लैंगिक शोषण करत राहिला. पोलिसांनी या तोतया डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.