जैन समाजासाठी स्वतंत्र जैन विकास आर्थिक महामंडळाची घोषणा! बुलडाण्यात जल्लोष....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारने जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. या निर्णयाचे बुलडाणा शहरात जैन बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. जयस्तंभ चौकात फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे तसेच सतत एका वर्षापासून या महामंडळाची स्थापना होण्यासाठी पाठपुरावा करणारे जैन अल्पसख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी,अल्पसख्यांक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व भाजपा जैन प्रकोष्ट चे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांचे जैन समाजा कडून आभार व्यक्त करण्यात आले.

हे महामंडळ स्थापना होण्यासाठी विविध लोकप्रतिनिधी यांचे पाठिंब्याचे पत्र तेजस भंडारी यांनी घेत बुलढाणा जिल्ह्यातर्फे पाठपुरावा केला होता.या जल्लोषात ओसवाल श्र्वेतांबर जैन संघाचे माजी अध्यक्ष विजयबाफना, पवण कोठारी,दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष सचीन वाडेकर, श्र्वेतांबर दादावाडी मंदिर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष घनश्याम चोपडा,चेतन महाजन, मनोज पाटनी,अरविंद सैतवाल,गौतम बेगानी,प्रकाश देशलहरा,दिलीप कोठारी,संजय कोठारी,प्रदीप बेगाणी,सतीश कोठारी, डॉ.शिरिश जैन,तुषार कोठारी,रमेश चोपडा,तेजस भंडारी,प्रताप कोठारी,संतोश साखला ,सचिन देशलहरा,मनीष बाफना,पुष्कर छाजेड,अभिषेक चोपडा,आनंद संचेती,शरद जैन,मोहित भंडारी,अक्षय देशलहरा,अक्षय छाजेड,अभय बाफना,धीरज बाफना ,महावीर देशलहरा यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.