डिलिव्हरी बॉयचे तरुणीसमोर पँटची झिप उघडून अश्लील कृत्‍य!

 
पुणे (पुणे लाइव्ह वृत्तसेवा) ः डिलिव्हरी बॉयच्या अश्लील कृत्‍याची तक्रार २३ वर्षीय तरुणीने पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात केली आहे. ही तरुणी उंड्री परिसरात राहते. डिलिव्हरी बॉयने ऑनलाइन ऑर्डर केलेली लॅपटॉप बॅग देताना स्वतःच्या पँटची झिप खोलून तरुणीसमोर अश्लील कृत्य केले, असे तक्रारीत तरुणीने म्‍हटले आहे.
सतीश केंधळे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव पोलीस तपासात समोर आले आहे. त्‍याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तरुणीसोबत हा प्रकार १ डिसेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. तिने एका ऑनलाइन वेबसाईटवरून लॅपटॉपची बॅग ऑर्डर केली होती. ही बॅग घेऊन तरुण आला होता. त्‍याने बॅग तिच्याकडे दिल्यानंतर पँटची झिप उघडली आणि अश्लील कृत्‍य केले. तरुणीने घाबरून तिच्या आईला हा प्रकार सांगितला. तिच्या आईने त्‍याला जाब विचारला असता मी कोणाला घाबरत नाही. काय करायचे ते करा, अशी धमकी त्‍याने दिली.तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.