स्वतःपेक्षा १२ वर्षांनी लहान प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा!; अनैतिक संबंधात ठरत होता अडसर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषाचा काही वर्षांपूर्वी किशोर विठ्ठल सुतार याच्याशी विवाह झाला होता. त्यांना ३ मुले आहेत. प्रगतिशील शेतकरी म्हणून किशोरची गावात ओळख असली तरी त्याला दारूचे व्यसन होते. किशोर सतत कामात गुंतलेला असल्याने नवऱ्याचे आपल्याकडे दुर्लक्ष होतेय, असे मनिषाला वाटत होते. त्यामुळे गावातील २१ वर्षांच्या अविनाशवर ती फिदा झाली.
दोघांचे प्रेम बहरत गेले. किशोरला बायकोच्या संबंधाबद्दल संशय येऊ लागल्याने तो आणखी दारू पिऊन तिच्यासोबत वाद घालू लागला. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासापासून कायमचे मुक्त होण्यासाठी तिने किशोरचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. परंतु कोवळ्या अविनाशकडून एकट्याने हे जमणार नाही म्हणून मनिषाने गावातील धनाजी सूर्यभान वाघमारे याला सोबत घ्यायचे ठरवले. अविनाश आणि धनाजी यांनी किशोरला भरपूर दारू पाजली. किशोरची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनी त्याला गावापासून दूर असलेल्या एका उसाच्या शेताजवळ नेले. रात्री साडेनऊच्या सुमारास किशोरच्या गळ्यातील मफलरानेच त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उसाच्या फडात टाकून दोघे पसार झाले.
असा झाला उलगडा...
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याला शेतात किशोरचा मृतदेह आढळला. निलंगा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. २४ तासांच्या आता किशोरच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर धनाजीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. मनिषाने प्रियकर अविनाश व धनाजीच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस सध्या अविनाशचा शोध घेत आहेत.