हनीमूनला झाले नाही "ब्लडिंग'! इंजिनियरने बायकोवर घेतला लग्नाआधी अफेअर असल्याचा संशय!!
Jan 22, 2022, 13:24 IST
पुणे : लग्नाआधीच तुझे कौमार्य भंग झाले आहे. मधुचंद्राच्या रात्री ब्लडिंग का झाले नाही, असे म्हणत अमेरिकेत राहणाऱ्या उच्चशिक्षित नवऱ्याने बायकोचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ वर्षीय विवाहितेने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीवरून पोलिसांनी इंजिनियर पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा मागील वर्षी विवाह झाला होता. ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे. तिचा पती अमेरिकेतील टेक्सास येथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. लग्नानंतर दोघे पती- पत्नी अमेरिकेत गेले. मधुचंद्राच्या रात्री तुझे ब्लडींग का झाले नाही... लग्नाआधी तुझे कुणासोबत शारीरिक संबंध होते... अशी विचारणा पतीने केली. त्यानंतर तो सतत चारित्र्याच्या संशयावरून तिच्याशी भांडत होता. नंतर तो तिला घेऊन कर्नाटकात फुरसुंगी येथे आला. तिथेही सतत तिला मारहाण करून तिला घटस्फोट मागितला व धमकी दिली. सासू, सासऱ्यांनी सुद्धा तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.