तिला म्‍हणाला, तुझ्यासोबत वेळ घालवायचा...ती तयार झाली... दोघे जेवायला गेले, परतताना निर्जनस्थळी कार थांबवून त्‍याने केला बलात्‍कार!

 
पुणे ः शेजारच्या २० वर्षीय युवतीला हॉटेलमध्ये जेवायला नेऊन परतताना निर्जनस्थळी कार थांबवून बलात्‍कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणी काळभोरमध्ये समोर आली आहे. पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात ३० वर्षीय युवकाविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

विवेक सिद्धार्थ गाडेकर (रा. लोणा काळभोर) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. दोघेही शेजारी असल्याने चांगले ओळखीचे आहेत. १३ जानेवारीला पीडित तरुणीला त्‍याने जेवणासाठी बाहेर जाऊ. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, असे सांगितले. शेजारी असल्याने आणि ओळखीचा असल्याने तीही तयार झाली. त्याच्या कारमधून दोघे रात्री आठच्या सुमारास खराडी येथील पाजी दा ढाबा या हॉटेलमध्ये जेवायला गेले.

जेवण करून परतताना खराडी ते लोणी काळभोर रस्त्यावर निर्जनस्थळी विवेकने कार थांबवली. तिने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्‍याने जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले. नंतर तिला घरी सोडले. पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्‍याला अटक केली. सध्या त्‍याची चौकशी सुरू आहे.