नागपुरात कडाक्याच्या थंडीने घेतला ५ जणांचा जीव!

 
नागपूर : नागपूर शहरात यंदा तापमान कमालीचे घसरले आहे. कडक उन्हासाठी परिचित असलेल्या नागपूरकरांना यंदा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. काल, २२ डिसेंबर रोजी पारा ७.६ अंशापर्यंत खाली घसरला. थंडीमुळे शहराच्या विविध भागांत ५ जणांचा बळी गेला आहे.
गणेशपेठ, सोनेगाव, कपिल नगर परिसरात तीन जणांचे मृतदेह सापडले. वामन अण्णाजी सावळे (६५, रा. गणेश पेठ) या वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळला. कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशोक सोनटक्के (५३, रा. गंजीपेठ) हे ट्रकचालक कामठी रोडवर मृतावस्थेत आढळले. सोनेगाव परिसरात उदय भुते (५४) यांचा थंडीमुळे मृत्यू झाला. याशिवाय सोनेगाव भागात ५० वर्षीय अनोळखी महिला व ६० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. थंडीमुळे त्‍यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.