जावयाचा सासूवर बलात्काराचा खळबळजनक प्रकार!
एकतर्फी प्रेमातून तिच्या मुलीशी लग्न, नंतर जवळीक वाढवून लैंगिक शोषण!
Dec 5, 2021, 20:56 IST
ठाणे (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः ४५ वर्षीय सासूवर २७ वर्षांच्या जावयाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. जावयाविरुद्ध हिललाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सासूच्या तक्रारीनंतर जावई फरारी आहे.
जावयाचे लग्नाच्या आधीपासून सासूवर एकतर्फी प्रेम होते. याच कारणास्तव त्याने तिच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली. २०१८ मध्ये हे लग्नही पार पडलं. सासू हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत तर जावई उल्हासनगरमध्ये राहतो. लग्नानंतर त्याने सासूशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. काही महिन्यांतच जावयाने गोड-गोड बोलून सासूसोबत शारिरिरक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो सासूवर वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिला. दोघांच्या संबंधाची कुणकुण घरच्यांना लागली होती. एक दिवस त्याच्याच बायकोने दोघांना रंगेहात पकडले. बिंग फुटल्यानंतर सासूने जावयाविरुद्ध धमकावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. उल्हासनगर पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरारी आहे. त्याला अटक करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.