सावधान..! गुगलवर "ते' सर्च करताय? खावी लागेल जेलची हवा!
Dec 22, 2021, 11:28 IST
मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक जण गुगलवर आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असताे. आजारांवरील उपायांपासून तर स्वयंपाक घरातल्या रेसिपीपर्यंत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक गुगलचा वापर करतात. गुगल वर सांगितलेल्या गोष्टी काही वेळा बरोबर तर कधी कधी चुकीच्या असू शकतात. परंतु गुगलवर सर्च करताना जरा जपूनच सर्च केलं पाहिजे. अन्यथा जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकते... काय सर्च करू नये हे जाणून घेऊया...
- बॉम्ब बनविण्याची पद्धत : काही गोष्टींशी काहीही संबंध नसताना त्या गोष्टीबद्दल सर्च केलं जातं. बॉम्ब बनवण्याची पद्धत जर कोणी सर्च करीत असेल तर तो व्यक्ती अडचणीत येऊ शकतो. चुकीच्या सर्चवर सायबर सेलची कडक नजर असते. सुरक्षा एजन्सी तुमच्याविरोधात कठोर कारवाई करू शकतात. त्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.
- कुणाचे प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ फोटो व्हिडिओ लीक करणंसुद्धा गंभीर गुन्हा आहे. यासाठी सुद्धा जेलमध्ये जावं लागू शकतं. गुगलवर चाईल्ड पॉर्न सर्च करणे किंवा पाहणं, शेअर करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. यासंबंधी कायद्याचे उल्लंघन केल्यास जेलची हवा खावी लागू शकते.
- चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तो ऑनलाइन लिक करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा समजला जातो. गुगल वर गर्भपात करण्याच्या पद्धती सर्च करणेसुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे या गोष्टी चुकूनही गुगलवर सर्च करू नका. डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भपात केला जाऊ शकत नाही.