गाडी चालवताना कुत्रे मागे लागल्यावर काय कराल...
Feb 4, 2022, 08:54 IST
तुम्ही कितीही डेरिंगबाज असले तरी बाईक किंवा स्कूटरवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर भीती वाटणारच. विशेषतः रात्री कुत्रे मागे लागल्यावर अनेकांची भीतीने तारांबळ उडते. रात्री गाडी येताना दिसली की कुत्रे जवळ येतात आणि वेगाने गाडीच्या मागे धावायला सुरुवात करतात. अशा वेळी अनेक जण एक्सलेटर देऊन वेगात गाडी पळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र बऱ्याचदा अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते. गाडी चालवत असताना कुत्रे मागे लागल्यावर घाबरू नका. त्यांच्यापासून सुटका करण्याचा उपाय अतिशय सोपा आहे.
घाबरून जाऊन गाडी वेगात पळविल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्याऐवजी गाडीचा वेग कमी करा, असे केल्यानंतर बरेच कुत्रे पळणे आणि भुंकणे बंद करतात. बाईकचा वेग कमी केल्यावर जर कुत्र्यांनी पाठलाग सुरू ठेवला असेल तर गाडी थांबवा. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात कुत्रे शांत होऊन त्यांच्या मार्गाला निघून जातील. कुत्रे शांत झाल्यावर दुचाकीचा वेग वाढवा आणि तिथून निघून जा. कुत्रे मागे लागले की दुचाकीचा वेग कमी करणे किंवा दुचाकी थांबवणे हा उत्तम उपाय आहे.