धक्कादायक..! पुन्हा एकदा कोरोना, मास्क सक्ती अन् निर्बंध? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा...

 
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): देशातून कोरोना हद्दपार झाला असे वाटत असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. चीन मध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पार्श्वभूमीवर केंद्र व राजु सरकार अलर्ट मोडवर आहे. आता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

राज्यासह केंद्रात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर  राज्यात कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा टास्क कोरोना परिस्थितीबद्दल राज्य सरकारला सूचना करणार आहे. त्यामुळे आता पुन्हा मास्क लावावा लागणार का? पुन्हा निर्बंध लागणार का असे प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले आहेत.

   चीन मध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार कडून सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठविण्यात आली आहेत. आज केंद्र सरकारच्या स्थरावर यासाठी बैठक सुद्धा होणार आहे.