आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावर शरद पवार नाराज!

 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरे देणार असल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराजीच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सोशल मीडियावर तर टीकांची लाखोली वापहिली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घरे मोफत देणार नसून, त्यासाठी ७० लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले. मात्र सरकारच्या या निर्णयाबद्दल  अजूनही खरे कळायला मार्ग नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारचा आहे. मात्र आमदारांना घर द्यायला नको, हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र निर्णय सरकारचा आहे. माझा नाही. आमदारांसाठी वेगळा प्रकल्प राबवला जाऊ नये, असे शरद पवार म्हणाले. विरोधकांच्या टिकेला आम्ही किंमत देत नाही, असेही शरद पवार म्हणाले.