STATE NEWS खळबळजनक! महाराष्ट्र पुन्हा हादरला! आश्रशाळेतील १३ वर्षांच्या चिमुकलीवर अधीक्षकानेच केला बलात्कार

 
चंद्रपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलीय. निवासी आश्रशाळेत शिकणाऱ्या आदिवासी मुलीवर होस्टेलच्या अधीक्षकांनेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरंज तांडा गावात घमाबाई आश्रम शाळा आहे. या शाळेत पीडित १३ वर्षीय मुलगी शिकत होती. आश्रम शाळेत असणाऱ्या अधिक्षकाची चिमुकलीवर वाईट नजर पडली. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा तो तिचे शारीरिक शोषण करीत होता. या प्रकारामुळे  पीडित चिमुकलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती.
  
दरम्यान ४ ऑगस्ट रोजी शाळा प्रशासनाने पीडित मुलीच्या आईवडिलांना बोलावले. तुमच्या मुलीची तब्येत सतत खराब असते असे सांगत तिला येथून घेऊन जा असे सांगितले. वर्धा जिल्हा राहणाऱ्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला घरी नेल्यानंतर मुलीने सर्व हकीकत आई वडिलांना सांगितली.त्यानंतर याप्रकरणाची तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून बलात्कारी अधिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.