STATE NEWS खळबळजनक! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! फोन करून म्हणाला, देशी कट्ट्याने...

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.  मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने देशी कट्ट्याने शरद पवारांना ठार मारू अशी धमकी दिली. सिल्व्हर ओक या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांनी याप्रकरणाची तक्रार ग्रामदेव पोलीस ठाण्यात दिली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण? धमकी देण्यामागचे कारण काय याबाबीचा तपास पोलीस करीत आहेत.